university of logo
university of mumbai
 
extra mural studies
ems
 
ems आमची प्रकाशने  
 
 

वॄक्षराजी मुंबईची

 
 

डोळसपणे वृक्ष पहायला शिकवणारा वृक्ष सौंदर्याचा रसास्वाद हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे २००३ मध्ये सुरु करण्यात आला. त्या अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेले विद्यार्थी जन या विषयाच्या एका वेगळ्याच मांडणीमुळे पुरते लोभावून गेले. त्यातील अनेकांचा वृक्ष सौंदर्य न्याहाळणे आणि ते कॅमेर्‍यात पकडणे हाच मुख्य छंद झाला. एकमेकांना भेटून, पाहिलेल्या झाडाबद्दल इतरांना सांगणे हा ठरलेला साप्ताहिक किंवा मासिक कार्यक्रम झाला. मुंबईतल्या झाडांवर एक पुस्तिका करायचा बेत ठरला. सर्वांच्या उत्साहाची खात्री पटल्यानंतर या कल्पनेला आणखी पैलू पडत गेले आणि त्या स्वान्तसुखाय होऊ घातलेल्या पुस्तिकेए॓वजी 'वृक्षराजी मुंबई' हे राजस रुपातल पुस्तक अखेर आकाराला आलं.

या पुस्तकासाठी वृक्षरसिकांबरा॓बरच मुंबईतील नामवंत आणि वनस्पतीशास्त्रज्ञांनी लेख लिहिले आहेत. झाडांसंबंधी वनस्पतीशास्त्रीय माहिती बरोबरच सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक संदर्भ घेऊन लेख लिहिले गेले. एकूण ११३ झाडांसंबंधी लेख असून एकूण १२८ झाडांची छायाचित्रे यात आहेत. शिवाय फुले, पाने, फळे यांचे तपशील दर्शवणारी १२० छायाचित्रे यात समाविष्ट आहेत. छायाचित्रणाचे काम सुप्रसिध्द छायाचित्रकार श्री. संजू हिंगे यांनी केले आहे. हेच पुस्तक मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवादित करुन  सेंट्रीज् ऑफ मुंबई या नावाने प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. श्रीधर राजेश्वरन यांनी इंग्रजीमध्ये लेखांचा स्वैर, काव्यात्म अनुवाद केला आहे.

या दोन्ही पुस्तकांचे संपादन प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ  डॉ. शरद चाफ॓कर,वनस्पतीतज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत लट्टू  आणि बहि:शाल शिक्षण विभागाच्या संचालक मुग्धा कर्णिक यांनी केले आहे.

ही दोन्ही पुस्तके कॉफीटेबल पुस्तक॓ म्हणून निर्माण करण्यात आली आहेत. उत्कृष्ट मुद्रण, भरपूर रंगीत छायाचित्रे आणि माहितीपूर्ण रंजक लेखन यामुळे ही पुस्तके संग्राह्य ठरतात.

या दोन्ही पुस्तकांची निर्मिती "तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळाने" (ओ. एन. जी. सी.) पुरस्कृत केली आहे. दिनांक २१ जुलै २००७ रोजी ही पुस्तके प्रकाशित झाली.

दोन्ही पुस्तकांची किंमत प्रत्यकी रु. २०००/- असून ही पुस्तके बहि:शाल शिक्षण विभाग , मुंबई विद्यापीठ,आरोग्य केंन्द्र इमारत,   २ रा मजला,विद्यानगरी,मुंबई - ४०० ०९८. येथे मिळतील.फोन नं. (०२२) ६५९५ २७६१ / ६५२९६९६२

बहि:शालच्या विद्यार्थ्यांना २५% सवलत, शिक्षणक्ष॓त्रातील सर्वांना २०% सवलत दिली जात॓. इतर व्यक्तींना एकाप॓क्षा अधिक प्रती घ॓तल्यास २०% सवलत दिली जात॓.

इतर व्यक्तींना एकाप॓क्षा अधिक प्रती घ॓तल्यास २०% सवलत दिली जात॓. मराठी मॅजेस्टिक बुक स्टॉल व इंग्रजी पुस्तक स्ट्रॅन्ड बुक स्टॉल येथेही उपलब्ध आहे.

 

   
 
 
 
 
 
Home | About us | Certificate Courses | Utility Courses | Vacation Courses | Our Publications | Rural Programme| Contact us | Marathi
 
Copyright © 2009, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.