university logo
mumbai vidyapith
bahishal shikshan vibhag
bahishal
 
ems

वॄक्ष सौंदर्याचा आस्वाद

 
 
  माध्यम : मराठी, दु. २.०० ते ५.०० (शनिवार व रविवार)
   
  कालावधी :
   
  वेळ :
   
 

शुल्क : रु. ७५०/-

   
   
 

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे वॄक्ष सौंदर्याचा आस्वाद हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईची वॄक्षसंपदा डोळसपणे पहाण्याची संधी या उपक्रमातून मिळेल. 'वॄक्ष सौंदर्याचा आस्वाद' (ट्री अँप्रिसिएशन) असे या उपक्रमाचे नाव असून तीन वीक-एण्ड्स (शनिवार-रविवार) मध्ये दु. २.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यत भटकंती करुन मुंबईतील वॄक्षांची माहिती घेणे असा कार्यक्रम असेल. दक्षिण मुंबई विद्यापीठ उद्यान, मलबार हिलचा उतार, जिजामाता उद्यान, दादर पारसी कॉलनी, संजय गांधी उद्यान या ठीकाणी विद्यार्थ्याना फिरवून वॄक्षसौंदर्याचा आस्वाद घेतला जाईल.

या उपक्रमाचा उद्येश या झाडांचे या शहरातील अभिमानास्पद वाटावे असे स्थान या लोकांच्या मनात ठसवावे असे आहे. त्यांचे सांस्कॄतिक, सामाजिक महत्व, पर्यावरणाच्या साखळीतील त्यांचे महत्त्व याचबरोबर झाडांशी जुळलेल्या कथा, कविता, किस्से, साहित्यातील उल्लेख हे देखिल सांगितले जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झाडांनी धारण केलेले आकार, रचना, इतर क्लुप्त्या, स्वसंरक्षणासाठी, आणि सॄजनासाठी झाडांची अंतःसज्ञा कशी काम करते, झाडांची शास्त्रीय नावे, स्थानिक नावे, त्यांची व्युत्पत्ती अशी भरपूर माहिती यातून लोकांना मिळावी असा विचार आहे. डॉ. शरद चाफेकर, डॉ. सी. एस. लट्टू, डॉ. रंजन देसाई, डॉ. राजेंन्द्र शिंदे हे वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्रातील नामवंत तज्ञ या उपक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. अभ्यासक्रमात भाग घेण्यासाठी वय व शिक्षणाची अट नाही. संवादाचे माध्यम इंग्रजी, हिन्दी, मराठी कोणतेही असू शकते.

   
 
 
 
 
मुख्य पान | आमच्याविषयी | प्रमाणपत्र अभ्यासक्रम | उपयुक्त अभ्यासक्रम | सुट्टीतले अभ्यासक्रम |
आमची प्रकाशने | ग्रामीण कार्यक्रम | संपर्क | इंग्रजी
 
Copyright © 2009, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.