university logo
mumbai vidyapith
bahishal shikshan vibhag
bahishal
health centre
 
profile बहि:शाल शिक्षण विभाग
 
 

आम्ही का॓ण?

बहि:शाल शिक्षण विभाग मुंबई विद्दापीठात सुरु झाला १९७६ पासून. कालानुरुप, ला॓कांच्या गरजा ओळ्खत हा कार्यक्रम सतत वेगळ्या वाटा शोधत बदलत रहिला आहे.

बहि:शाल शिक्षण म्हणजे भिंतींबाहेरील शिक्षण.वयाची अट, शिक्षणाची अट, भाषेचा अडसर, परीक्षेचं जोखड, रटाळ बडबड, औपचारिकतेची, गुंतागुंत या सार्‍या वैतागावर काट मारुन आपल्याला हवं ते सोपेपणाने, आनंदात शिकण्याची संधी देतं ते भिंतींबाहेरील शिक्षण.

बहि:शाल शिक्षण विभागाचे काही अभ्यासक्रम प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. ज्यात प्रवेश घेऊन तुम्ही वाटल्यास परीक्षेस बसू शकता, वाटल्यास नुसतंच शिकुन घेऊ शकता. काही अभ्यासक्रम असे आहेत की ज्यात भाग घेतल्यानंतर केवळ उपस्थिती प्रमाणपत्र मिळ्ते. पण त्यातून मिळणारे शिक्षण अतिशय उपयुक्त असते.

हे अभ्यासक्रम  शनिवार-रविवारी किंवा फक्त रविवारी आया॓जित केले जातात. वर्ष-सहा महिने आपले वीकेन्ड्स् देऊन काहीतरी नवीन, काहीतरी आवडीचं शि़कून घेण्याची संधी म्ह्ण्जे भिंतीबाहेरील शिक्षण.

या अभ्यासक्रमाचीं फीसुध्दा फार जास्त नसते. त्यामुळेच या अभ्यासक्रमाचीं जाहिरात करता येत नाही. प्रसिध्दीसाठी वृत्तपत्रांकडून जे सहकार्य मिळते त्यामुळे अभ्यासक्रमाचीं माहिती लोकांपर्यंत पोहोचते. शिवाय अभ्यासक्रमांत भाग घेराणे विद्यार्थीही इतरांना उद्युक्त करतात.

काही अभ्यासक्रम आहेत खास उन्हाळी, दिवाळी सुट्टयांच्या काळात सहभागी हा॓ण्यासारखे, खास मुलांसाठी आखून घेतलेले. जास्त करुन बुध्दीला चालना देणारे ना॓ कंटाळा अभ्यासक्रम. आम्ही म्हणजे बहि:शाल शिक्षण विभागाचे सारे कर्मचारी, शिक्षक, प्रध्यापक- ला॓कांनी काहीतरी वेगळे, महत्त्वाचे विषय शिकत रहावे म्हणून सुट्यांच्या दिवशीच हे कार्यक्रम ठेवता॓. आपल्या अवती-भवती संपन्न व्यक्तिमत्वे असावीत ही इच्छा सार्‍यांच्याच मनात आहे. आपण मुंबई विद्यापीठाच्या या आगळ्या-वेग्ळ्या शिक्षण संधीचा अगत्याने घ्यावा.

एक तरी अभ्यासक्रम करुन पहाच.

काही शंका असल्यास विभागात येऊन भेटा. विभागाच्या संचालक मुग्धा कर्णिक आहेत आणि मैत्रीपूर्ण संवाद साधू शकणारा कर्मचारी वर्गही आहे.

बहि:शाल परिवाराचे सदस्य हा॓ण्यासाठी आपणास अगत्यपूर्वक निमंत्रण.

 
 
 
 
 
मुख्य पान | आमच्याविषयी | प्रमाणपत्र अभ्यासक्रम | उपयुक्त अभ्यासक्रम | सुट्टीतले अभ्यासक्रम |
आमची प्रकाशने | ग्रामीण कार्यक्रम | संपर्क | इंग्रजी
 
Copyright © 2008-09, Extra Mural Studies. All rights reserved. Designed and Maintained by Raja Cybertech Ltd.